हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. आणि हिंदू धर्मात मंदिरांना एक विशेष महत्त्व आहे. सर्व मंदिरात त्या देवतेचे वाहन नेहमीच देवतेसमोर दिसतात. आणि शिव मंदिराच्या बाबतीतही भगवान शिवचे वाहन म्हणजे नंदीच शिवलिंगासमोर असतात ; परंतु नंदीशिवाय भगवान शंकरांची फारच फार थोडी रहस्यमय मंदिरे आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भगवान कोटेश्वर महादेव मंदिर महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील बोटावर मोजता येतील अशा नंदी नसलेल्या मंदिरांपैकी एक आहे.
(तुम्हाला कोटेश्वर महादेव कोडीत गावात कसे स्थापित झाले हे जाणून घ्यायचे असेल तर माझा दुसरा ब्लॉग वाचा ज्याची लिंक खाली दिलेली आहे)
https://koteshwarkodit.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=1
फार पूर्वी कोडित गावात एक शिंपी होता जो भगवान नंदीच्या मूर्तीवर आपल्या सुया धार लावायला मंदिरात येत असे आणि एक दिवस भगवान नंदी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सुईला सोन्याच्या सुईत रुपांतर केले परंतु भगवान नंदी यांनी त्यांच्यासाठी अशी अट घातली की तो कोणालाही याविषयी सांगणार नाही किंवा तो लोकांना याबद्दल कळू देणार नाही. बरेच दिवस उलटले तो खूप श्रीमंत झाला आणि लोक आश्चर्यचकित झाले आणि काहींनी त्याच्या श्रीमंतीबद्दलचे सत्य गुपचूप जाणून घेतले. आणि भगवान नंदी अटीनुसार मंदिरातून अदृश्य झाले आणि त्या काळापासून कोटेश्वर महादेव मंदिरात भगवान नंदी नाहीत. हे तुुुुम्ही खालील व्हिडीओमध्ये पाहू शकता.
No comments:
Post a Comment